Assembly Elections Voting: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांचे Exit Polls कधी येणार? जाणून घ्या वेळ

आज महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. निवडणूक प्रचाराच्या जोरदार फेरीनंतर महाराष्ट्र आणि झारखंडमधील काही मतदारसंघातील मतदार त्यांचे पुढील सरकार निवडण्यासाठी मतदान करत आहेत.झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे, तर महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे.या निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे.

आता मतदान पार पडल्यानंतर याचे एक्झिट पोल कधी येणार याची उत्सुकता लागली आहे.भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संपूर्ण राज्यात मतदान संपल्यानंतरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाऊ शकतात. पोलस्टर आणि मीडिया हाऊसेस २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांसाठी ही एक्झिट पोल प्रसारित करू शकतात.मतदान करण्यापूर्वी मतदारांवर एक्झिट पोलच्या अंदाजांचा प्रभाव पडणार नाही.

ही सर्वेक्षणे वेळेआधी जाहीर केल्याने अनिर्णित मतदारांवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे निवडणुकीच्या निकालावर अवाजवी प्रभाव पडू शकतो. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम 126A नुसार मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल प्रकाशित करता येत नाहीत.