इचलकरंजीत १४ थिमॅटिक मतदान केंद्र…..

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल पार पडली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीने 68.95% मतदान झाले. सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या उत्साहाने मतदान झाले. त्यानंतर मतदान प्रक्रियेला संथ गती दिसून आली. दुपारी चार नंतर काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगांच्या रांगा लागल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. इचलकरंजी मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत १४ केंद्रावर थीम बेसड़ पोलिंग स्टेशन उभारण्यात आली होती. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन – आण्णा रामगोंडा शाळा, पिंक पोलिंग स्टेशन – बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, वस्त्रनगरी – सरस्वती हायस्कूल, टाकाऊ पासून टिकाऊ- आदर्श विद्यामंदिर,

महिला सबलीकरण – द न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मॉडेल पोलिंग स्टेशन – गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वस्त्र नगरीच्या पाऊलखुणा – गंगामाई विद्या मंदिर, चांद्रयान व्यंकटराव हायस्कूल व जूनियर कॉलेज, प्लास्टिकचा वापर टाळा – माई बाल विद्यामंदिर, इचलकरंजीचा सांस्कृतिक इतिहास – गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दिव्यांग पोलिंग स्टेशन – तात्यासाहेब मुसळे विद्यालय, पर्यावरण संवर्धन- मथुरा हायस्कूल, पर्यावरण संवर्धन – शहापूर हायस्कूल आदी मतदान केंद्रांचा समावेश होता.