गुलाबी थंडीतील दिवसात महिलांना त्यांच्या मैत्रिणींसोबत धमाल करण्याची संधी दै. पुढारी कस्तुरी क्लबने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी कोकण दर्शन सहलीचे आयोजन दि. 6 व 7 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.मैत्रिणींसोबत एन्जॉय करण्यासाठी आजच तुमची नाव नोंदणी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहलीमध्ये 6 डिसेंबररोजी सिंधुदुर्ग किल्ला दर्शन, बोटिंग, तारकर्ली बीच, देवबाग बीच, सूर्यास्त दर्शन असे नियोजन आहे. बोटिंग, रॉक गार्डन, संगीतकारंजा पाहता येणार आहे. मालवणमध्ये मुक्काम आहे. दुसर्या दिवशी कुणकेश्वर बीच, भगवान शंकर मंदिर दर्शन, देवगड किल्ला, गणपती दर्शन, विजयदुर्ग किल्ला, बोटिंग, डॉल्फिन गार्डन या ठिकाणी भेटी देणार आहे. दि. 5 डिसेंबरला रात्री 9.30 वाजता पुढारी कार्यालय तहसील कार्यालयासमोर, इस्लामपूर येथून सहल निघणार आहे व दि. 7 रोजी परत येणार आहे.
सहलीचा खर्च सभासद महिलांसाठी 3100 रुपये, तर बिगर सभासद महिलांसाठी 3300 रुपये असा आहे. यामध्ये येण्या-जाण्याचा प्रवासखर्च, राहणे, सकाळी चहा व नाश्ता, दुपारी व सायंकाळचे जेवण या अनलिमिटेड सुविधा मिळणार आहेत. यामध्ये एका नॉनव्हेज जेवणाचा समावेश आहे. मात्र बोटिंगचा खर्च स्वतः प्रवाशांनी करावयाचा आहे.
गाडीत बसण्यासाठी प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य मिळणार आहे. ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच सीट कन्फर्म होईल. फक्त 50 सीट्सची मर्यादा आहे. 4 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी बंधनकारक आहे.