बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फिंगल चक्री वादळाचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात (Maharashtra Weather) ढगाळ परिस्थिती वाढते आहे.राज्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. ३०) ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सहा डिसेंबरला सांगलीसह राज्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पाऊस रब्बीसाठी फायदा, तर द्राक्ष बागांना फटका बसू शकतो. हवामान विभाग (Meteorological Department) तसेच अभ्यासकांनी पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात शनिवारपासून ढगाळ परिस्थिती मराठवाड्यासह दक्षिण विभागात असण्याची शक्यता आहे. सध्या ४ डिसेंबरपर्यंत तरी पावसाची शक्यता नाही. २ ते ४ डिसेंबरपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. सहा डिसेंबरला राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी सांगलीसह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात केप केमोरीन पासून २५० किलोमीटर समुद्रात कमी दाब क्षेत्र विकसित आहे ते ज्या मार्गाने पुढे जात आहे त्याचे मार्ग आणि परिणाम होत आहे. कदाचित डीप डिप्रेशनमध्ये रुपांतर होऊन त्याचा प्रभाव कमी होईल. परंतु, जर अधिक परिणाम झाला, तर फेंगल चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. त्याचा राज्यावर परिणाम कमीच असेल.