इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून मा. संजयदादा कांबळे यांचा अर्ज दाखल

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार? याविषयी तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो. लोकसभा निवडणुक 2024 निकालामध्ये इचलकरंजी मतदारसंघ हा गेमचेंजर ठरला.

सद्या इचलकरंजी मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून तीन, राष्ट्रवादी एक व मँचेस्टर आघाडीकडून एक असे इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावत आहेत. यातून कोण बाजी मारणार आणि त्यातून कोणाची नाराजी ओढावणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये इचलकरंजी विधानसभेची जागा परंपरागत काँग्रेसकडेच राहावी, यासाठी कॉँग्रेसच्या वतीने संजय कांबळे, शशांक बावचकर आणि राहुल खंजिरे यांनी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे.

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्याची अंतिम मुदत ही आज म्हणजेच शनिवार 10 ऑगस्ट होती. आगामी 2024 विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा अर्ज मा. संजयदादा कांबळे यांनी आज दाखल केलेला आहे.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला अर्ज भरलेला आहे.कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार वाईकर यांनी हा अर्ज स्विकारला आहे. मा. संजयदादा कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्याने काँग्रेस पक्षाकडून एकच जल्लोष करण्यात आला.

यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई,महीला कार्याध्यक्ष बिस्मिल्ला गैबान, कोरोची काँग्रेस अध्यक्ष पोपट शिंदे, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष गोविंद आढाव,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष युवराज शिंगाडे,सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष ओंकार आवळकर, अनुसुचित जाती जमाती सेलचे शहर अध्यक्ष सतिश कांबळे, विजय मुसळे, प्रमोद मुसळे, हर्षद मिराशी,प्रवीण पाटील, योगेश पंजवानी,अरमान गोरवाडे,दिलीप पाटील, महेश माळी, योगेश कांबळे,राजु काटकर, युवराज कांबळे, मुजम्मिल मुजावर, चंद्रकांत मिस्त्री,सुनील यादव,रविराज बुगड, सुनील म्हेतर ,सचीन नाकील, संजय सातपुते, संतोष डोंगरे,विद्या भोपळे, सावित्री हजारे,वेदिका कळंत्रे यांचेसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.