महूदमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ….

महूद येथील मध्यवर्ती भागात असलेल्या हनुमान मंदिर परिसरामध्ये मंगळवारी मध्यरात्री चोरांनी बंद असलेली सातहून अधिक घरे तसेच ज्वेलर्सह दोन दुकानांची कुलपे तोडून आत मध्ये प्रवेश केला. यामधील येथील जितेंद्र सरगर, निलेश बाजारे, महादेवकर, अमोल पळसे यांच्याकडे भाड्याने राहणारे नवगण, सागर कुलकर्णी, ब्युटी पार्लर, पोपट घाडगे यांची बाहेरून बंद असणारी राहती घरे खोल्या व गाळे यांची कुलपे तोडून आत मध्ये प्रवेश केला.

घरातील मौल्यवान वस्तू, पैसे यांचा शोध घेण्यासाठी चोरट्याने घरातील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसून आले. येथील हनुमंत कांबळे यांचे शिलाईचे दुकान फोडून ग्राहकांचे शिवून तयार ठेवलेले नवीन कपडे चोरट्याने पळवले आहेत. तर हनुमान मंदिरासमोर असलेल्या सिद्धनाथ ज्वेलर्स या दुकानाची कुलपे तोडून दुकानात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केल्याचे समजते आहे. भल्या पहाटे ही चोरीची माहिती पोलिसांना मिळताच बुधवारी सकाळी घरांना, दुकानांना भेटी देऊन पाहणी केली. संबंधित चोरटे काही ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत.