विट्याचे माजी उपनगराध्यक्ष लकडे उद्योग समूहाचे संस्थापक व बाळासाहेब (काका) लकडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त जय मल्टीपर्पज हॉलमध्ये पुष्पांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी जेष्ठ नेते गंगाधर लकडे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, खानापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, मुकुंद लकडे, विक्रम लकडे, विशाल लकडे, आयुष लकडे, आदित्य लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर म्हणाले, स्व. बाळासाहेब काका लकडे यांनी विटा शहराच्या आणि समाजाच्या विकासासाठी काही कल्पना मांडलेल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी काकांनी नेहमीच तळमळीने काम केले. त्यांच्या पश्चात त्यांच्या विकासाच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लकडे कुटुंबीयांनी त्याच तळमळीने काम करावे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत असे सांगितले.