विट्याची सूत्रे हलवणारा युवा नेता चर्चेत……

लोकसभा निवडणूक झाल्यापासून विट्याचा युवा नेता चांगलाच चर्चेत आला आहे. कारण गेल्या 35 वर्षापासून पाटील घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कदम कुटुंबातील आता विधानसभा निवडणुकीत धक्का तंत्र वापरत बाबर गटात जाहीर प्रवेश केला. आणि त्यांनी आपणच विट्यात वरचढ असल्याचं सिद्धही केलं. या योद्धाचं नाव आहे ॲड.धर्मेशभैया पाटील. खरंतर 30 नोव्हेंबर या दिवशी धर्मेश भैयांचा वाढदिवस असतो आणि या दिवशी विटा सह परिसरात अनेक जण त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. परंतु यावेळचा वाढदिवस चर्चेत आला आहे. धर्मेश भैय्या पाटील हे तसे आटपाडीच्या तानाजी पाटील यांच्या मामांची मुलगे आहेत. विट्यातील ज्येष्ठ नेते विलास बापू कदम हे तानाजी पाटील यांचे मामा आहेत.

तसेच विसापूर सर्कल मधील व शिरगाव येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप नाना पाटील हे देखील धर्मेश पाटील यांचे पाहुणे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्ष तानाजी पाटील व प्रताप नाना पाटील यांनी बाबर गटात धर्मेश यांनी प्रवेश करावा अशी विनंती केली होती आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून संपूर्ण कदम घराण्याने हा मोठा निर्णय घेतला आणि तो आता सार्थकी ठरला.

अनिल भाऊंच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन सुहास भैयांना आमदार करण्यासाठी संपूर्ण कुटुंबांनी निर्णय घेतला. अशोक भाऊ यांच्या सभेत धर्मेश भैया ने विरोधकांच्या टीकेला उत्तर देत मला सुहास भैया आणि अमोल दादा आपण पूर्वीपासूनचे जिवलग मित्र असल्यासारखं वाटलं असे सांगितलं होतं. आता ही मैत्री अजूनही घट्ट झाली.

त्यांनी पाटील गटाला सोडचिट्टी देऊन बाबर गटात प्रवेश केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली. परंतु या टीकेला त्यांनी बाबर गटाला तब्बल 322 मतांचे मताधिक्य देऊन उत्तर दिलं.