विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी थेट आ. जयंत पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले. जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या समर्थकांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. दुसरीकडे मात्र भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेते विधान परिषदेवर जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. इच्छुक नेत्यांनी आपल्या मुंबई वाऱ्या वाढविल्या आहेत.
भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे आमदारकीची फिल्डींग लावली आहे. याचाच सारासार विचार करता निशिकांत पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न केले जात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. निकालानंतर इस्लामपूरात सध्या निशिकांत पाटील यांचे जोरदार वारे असून त्यांच्या समर्थकांकडून त्यांना विधान परिषदेवर घेऊन ताकद देण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.