नवीन वर्षात हातकणंगलेतील या ग्रामपंचायतींचा वाजणार बिगुल…

नवीन वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुळा उडणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका महानगरपालिका तसेच ग्रामपंचायती लगबग पहावयास मिळणार आहे आगामी वर्षात जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या 433 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात.२४ जानेवारी 2025 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली अंतिम प्रभाग रचना जिल्हाअधिकाऱ्यानी जाहीर करायची आहे.

जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये पाच वर्षाची मुदत संपणाऱ्या 433 ग्रामपंचायती असून त्यांच्या निवडणुका काही टप्प्यांमध्ये पुढील वर्षी घेण्यात येणार आहेत. पुढील वर्षी दिवाळीनंतर या निवडणुकांच्या कार्यक्रम लावण्याची शक्यता आहे. 24 जानेवारी 2025 ला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे व पुढील वर्षी टप्प्याटप्प्याने मुदत संपणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायती अशा हातकणंगले, दुर्गेवाडी, वठार तर्फ वडगाव, खोची, बिरदेववाडी, कुंभोज, नेज, हालोंडी, जंगमवाडी, चंदुर, कबनूर, माणगाव, माणगाववाडी, रुई, लाटवडे, मिनचे, तासगाव, किनी, मनपाडळे, पाडळी, वठार तर्फ उदगाव, तिळवणी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.