आवाडे हाळवणकरांना संधी द्या….

भाजपाचे कार्यकर्ते आणि जनतेला खासदार धैर्यशील माने भेटत नाहीत त्यांचा संपर्कही होत नाही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून त्यांना अजिबात उमेदवारी देऊ नका कमळ चिन्हावर आमदार प्रकाश आवाडे किंवा माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना संधी द्या असा मी विश्वास देतो गुलाल लागेल कमळ फुलेल असा दृढ विश्वास भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते व ग्रामीण उपाध्यक्ष धोंडीराम जावळे यांनी व्यक्त केलेला आहे.

केंद्र सरकारने राबवलेल्या योजना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद खा. माने यांनी तोडला आणि सोडला. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत म्हणूनच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर किंवा सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्या असे त्यांनी म्हटले आहे.