‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ सध्या पाहायला मिळतेय. रिलीजआधीच प्रेक्षकांनी तिकीटे बुक करून ठेवली आहेत. चित्रपट रिलीज होण्यासाठी आत काहीच दिवस उरले असताना तिकीटे बुक होण्याची संख्याही वाढत चालली आहे. अशातच आता तिकीटांचे दरही वाढवण्यात आले आहेत. तिकेटे फारच चढ्या किंमतीत विकली जात आहेत.अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ 5 डिसेंबरला सिनेमागृहांमध्ये रिलीज होतोय.
आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले असून तिकिटांचे काआगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. रिलीजच्याआधीच चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कारण प्रेक्षकांनी आधीच तिकेट बुक करून ठेवली आहेत. पण ‘पुष्पा 2’ च्या बुकिंगची एक अनोखी गोष्ट म्हणजे तिची तिकिटे मोठ्या किमतीत विकली जात आहेत. जवळपास 1000 रुपयांच्या घऱात या तिकिटांची किमंत आहे.मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये ‘पुष्पा 2: द रुल’ चे तिकीट दुप्पट किंमतीने विकली जात आहेत.
कारण समोर आलेल्या रिपोर्टनुसार दिल्ली एनसीआरमधील थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ च्या तिकिटाची किंमत 1800 रुपयांपर्यंत आहे. तर, मुंबईत चित्रपटाचे तिकीट 1600 रुपयापर्यंत आहे. तसेच बंगळुरूमध्ये सर्वात महागड्या तिकिटासाठी 1000 रुपयांपर्यंत किंमत आहे.अल्लू अर्जुनचा सर्वात मोठा फॅन्डम मानल्या जाणाऱ्या तेलुगू राज्यांपैकी एक असलेल्या तेलंगणामध्ये सरकारने ‘पुष्पा 2’ साठी विशेष शो असणार आहे. तेलंगणा सरकारने रिलीज तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच 4 तारखेपासून ‘पुष्पा 2’ च्या स्पेशल स्क्रीनिंगला परवानगी दिली आहे. तसेच तेलंगणात ‘पुष्पा 2’च्या खास शोसाठी तिकीट दर हा फक्त 800 रुपयांपर्यंत ठेवण्यात येणार आहे.