गेल्या तीन वर्षांपासून एसटीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटांना तोंड देत आहे. नवीन सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.एसटी महामंडळाकडून १४.३ टक्के भावेवाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, आता ज्या प्रवासासाठी शंभर रुपये भाडे लागत होते त्याच प्रवासाला आता ११५ रुपये भाडे द्यावे लागणार आहे.सरकारने महिला, ज्येष्ठ, विद्यार्थी आदींना प्रवासात सवलती दिल्या आहेत. त्यामुळे महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे बोलले जातेय.
गेल्या तीन वर्षांपासून एसटी महामंडळाने भाडेवाढ केलेली नाही. शासनाच्या सवलतीवर एसटीला वेगळे पैसे खर्च करावे लागतात. हे पैसे द्यायलाही एसटी प्रशासनाकडे पैसे नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाडेवाढ करणे प्रशासनाला अनिर्वाय आहे. आता भाडेवाढीचा निर्णय घेतल्याशिवाय काही पर्याय नाही, असे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे.एसटी महामंडळाने प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवला आहे. आता महायुतीचे सरकार तो मान्य करते की फेटळून लावते, याकडे लक्ष लागले आहे. सत्तेवर येताच जनतेला भाडेवाढीची भेट नवीन सरकार देणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.