शिवसेनेचे जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या पाठपुराव्यामुळे वाळवा शहरामध्ये अद्ययावत एसटी बस्थानक होणार आहे. नियोजित बस्थानकाच्या जागेची पाहणी वाहतूक निरीक्षक ए. पी . घोरपडे , सहाय्यक निरीक्षक जयदेव सतूरकर, वाहतूक नियंत्रक आर. पी. मेंगाणे यांनी केली. दरम्यान , गौरव नायकवडी म्हणाले , वाळवा गावात बस्थानक व्हावे अशी बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती. सरपंच असताना त्यादृष्टीने प्रयत्न पाठपुरावा देखील केला होता. तदनंतर परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक त्यांना त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
वाळव्यात लवकरच होणार सुसज्ज बसस्थानक
