निशिकांत भोसले पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन…..

विधानसभेच्या निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार जयंत पाटील यांनी मा. निशिकांत भोसले पाटील यांचा अल्पशा मताने पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर प्रकाश शैक्षणिक संकुलात महायुतीच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांची चिंतन बैठक बोलविण्यात आली होती,यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सी.बी.पाटील हे होते.यावेळी आ.सदाभाऊ खोत, माजी आ.भगवान सांळुखे, हुतात्मा उद्योग समुहाचे युवा नेते गौरव नायकवडी, केदार पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सनी खराडे, धैर्यशील मोरे, प्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला वेदना देणारा आहे,मात्र कोणी ही खचुन जाऊ नका, तुम्हीच माझी ऊर्जा व आधार आहात, तुमचा माझ्यावर असलेला हक्क कायम असेल, तुमच्यासाठी माझा दरवाजा कायम खुला असेल.आपण ही निवडणुक मोठ्या धैर्याने लढली.

यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण महायुती म्हणुन एकसंघपणे मोठ्या ताकदीने लढणार आहोत. आपण विकासाचे,विचाराचे राजकारण करणारी सेवक आहोत, त्यासाठी या क्षणापासुन पुन्हा नव्याने लोकांच्यात जाऊन कामाला सुरुवात करु असे मत इस्लामपुर विधानसभेचे महायुती चे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.