हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे पथकाने जेरबंद केले. प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर (वय २४ रा. वाळवेकरनगर, हुपरी ) व किरण मारुती जाधव (वय २५ रा. हुपरी) अशी नावे आहेत. त्याच्याकडून चोरीतील चार तोळे सोने, अर्धा किलो चांदी, ४४ हजाराची रोकड जप्त केली. हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसी चोरी झाली होती.
या गुन्हयाचा समांतर तपास एलसीबीचे पथक करीत होते. हा गुन्हा प्रमोद वडर या सराईत चोरट्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केला समजली. त्याला ताब्यात घेऊन असल्याची माहिती पोलीसांना कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. चार तोळे सोने, अर्धा किलो चांदी व ४४ हजार रुपयांची रोकड असा ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अटक केलेल्या संशयीतास मुद्देमालासह हुपरी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सरगर, उपनिरीक्षक शेष मोरे, प्रसाद कोळपे, पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, सतीश जंगम, अमित सर्जे, संजय पडवळ, राजू कांबळे, महेंद्र कोरवी, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, प्रभाकर कांबळे यांनी तपास केला.