आटपाडी तालुक्यातील एका गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी आटपाडी पोलिसात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात आटपाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे.
अपहृत मुलगी १७ वर्षे ३ महिन्यांची असून रंग गोरा, उंची ५ फूट, अंगाने सडपातळ, काळे पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला टी-शर्ट व निळी जीन्स पॅन्ट घातलेली आहे. या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळून नेले आहे. याबाबतची फिर्याद अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलिसात दिली आहे. या घटनेचा तपास पोलिस जाधव करीत आहेत.
