आ. जयंत पाटील यांचा पेठनाक्यावरील अभिनंदनाचा फलक कार्यकर्त्यांना बळ देणारा

इस्लामपूर मतदारसंघात शांतता पसरली असताना युवा उद्योजक व कासेगावचे ग्रा.प. सदस्य अतुल लाहीगडे यांनी लावलेला पेठनाक्यावरील आ.जयंत पाटील यांचा विजयी शुभेच्छा देणारा फ्लेक्स कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा ठरत आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचा पराभव करण्यासाठी सगळा महाराष्ट्र, तालुका, जिल्हा, एक झाला तरीपण विजयच तो पण आठव्यांदा अशा फ्लेक्स वरील ओळी बरंच काही सांगून जातात.

आ. जयंत पाटील अष्टपदी आमदार म्हणून झालेला विजय नेते आणि कार्यकर्ते यांना चिंतन करण्यास सांगून जातो. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची झालेली अनपेक्षित सरशी तर महाविकास आघाडीची झालेली पीछेहाट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यकत्यांना वेदना देणारी ठरली. तरीही पुढील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा तर कार्यकर्त्याची निष्ठा पाहायला येणारा काळच ठरवेल.