इस्लामपूर मध्ये आज पासून पुढारीच्या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलची सुरुवात होत आहे. हा फेस्टिवल आज पासून सुरू होऊन 6 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. जयंत पाटील खुल्या नाट्यगृहांमध्ये हे फेस्टिवल होत आहे.
या ठिकाणी विविध प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांची मेजवानी तसेच बच्चे कंपनीसाठी अनेक पार्क उभारण्यात येणार आहेत. वाळवा तालुका व पंचक्रोशीतील लोकांना मनसोक्त खरेदी व लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली मिळणार आहे.
या फेस्टिवल मध्ये चार चाकीपासून फर्निचर पर्यंत, सौंदर्यप्रसाधने, वॉशिंग मशीन, मसाल्यांचे पदार्थ, विविध वस्तू तसेच शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री नऊ पर्यंत हे फेस्टिवल असणार आहे. तसेच या फेस्टिवल मध्ये पाच दिवस दररोज लोकप्रिय टीव्ही मालिकांमधील कलाकार भेटीला येणार आहेत.