खानापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. सुहास (भैय्या) बाबर यांनी माजी आमदार स्वर्गीय संपतराव (नाना) माने यांच्या समाधी स्थळास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी मा. आमदार सुहास बाबर यांचा सत्कार शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजकुमार (दादा) माने यांच्या हस्ते केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा. श्री. तानाजी (तात्या) पाटील यांचा सत्कार शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव ड् विराज (भैय्यासाहेब) माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजाभाऊ शिंदे, अनिलसाहेब शिंदे, डी.बी. माने (माने), अभिजीत टिंगरे, नगरसेवक यशवंत तोडकर, संजय भगत, पत्रकार दत्तात्रय डोंगरे, बबलू भगत, पांडुरंग खराडे, माजी सरपंच धनंजय डोंगरे, पप्पू तोडकर, अक्षय भगत, बाळासाहेब होनराव, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांचे स्वर्गीय नानांना अभिवादन
