खानापूर नगरपंचायत नव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध विकास कामाचे उद्घाटन

खानापूर नगरपंचायत नव्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध  विकास कामाचे उद्घाटन व अंगणवाडी सेविका व नगरपंचायतच्या स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी यांचा आज सन्मान करण्यात आला. खानापूर शहरातील खानापूर ते जाधववाडी रोडवरील शहीद कॉर्नर सुशोभीकरणचा उद्घाटन सोहळा आज श्री शंकर जयसिंग भगत यांच्या शुभहस्ते व खानापूर घाटमाथ्याचे नेते श्री सुहास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्याचबरोबर खानापूर शहरातील पाझर तलाव येथे विकसित केलेल्या बगीचा या ठिकाणी नागरिकांना योगासन करण्यासाठी चबुतरा स्टेज बांधकामाचे उद्घाटन खानापूर घाटमाथ्याचे नेते श्री सुहास शिंदे यांच्या शुभहस्ते व पंचायत समितीचे माजी सदस्य श्री पांडुरंग डोंगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

त्याचबरोबर नगरपंचायत सभागृहामध्ये अंगणवाडी सेविका व नगरपंचायतच्या स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी यांचा आज नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारीसो, गटनेत्या, नगरसेवक, पदाधिकारी, सभापती,  नगरसेविका यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी खानापूर शहरातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, विविध विभागाचे युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.