हुपरी येथील चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशन व जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने शनिवार ता. २१ डिसेंबरला सोने, चांदी दागिने निर्यात प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मोहन खोत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या शिबिरात चांदी दागिन्याबरोबर सोने दागिणे निर्यातीच्या जागतिक संधीची माहिती, आयात निर्यात लायसन कसे काढावे, निर्यातीसाठी परदेशात कुठे कुठे संधी आहेत. त्यासाठी काय करावे लागेल.
निर्यातीसाठी भांडवल निर्मिती तसेच बँका व एमएसएमइकडून निर्यात वाढीसाठी शासनाच्या योजनांची माहिती, निर्यातीत येणाच्या अडीअडचणींबाबत इंत्यभूत माहिती मिळणार आहे. तसेच यावेळी वैयक्तिक मार्गदर्शनासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे तरी १५ डिसेंबर पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन मोहन खोत यांनी केले आहे.