इस्लामपूर – शिराळ्यात एकास एक लढतीचे प्रयत्न…..

इस्लामपूर – शिराळा मतदारसंघात गेल्या सात विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम आहे. प्रत्येक निवडणुकीत एकास एक लढतीसाठी प्रयत्न होतात. परंतु विरोधकांचे एकमत होत नाही. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर – शिराळ्यात एकास एक लढतीसाठी भाजप, शिंदेसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

इस्लामपूर वाळवा, शिराळा तालुक्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासह विधानसभा निवडणुकीबाबत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील भाजप, शिंदेसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. दोन्ही मतदारसंघात एकास एक लढत करण्यासंदर्भातही खलबते झाली.