इस्लामपूरमधील वाहतूकदारास साडेसहा लाख रुपयांचा गंडा!

येडमच्छिंद्र तालुका वाळवा येथील सुरेश भगवान पाटील यांनी ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून सहा लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुकादमावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी अशोक आहे. ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी अशोक नवनाथ भोसले राहणार अंतरवली तालुका भूम यांचा व सुरेश भगवान पाटील या दोघांमध्ये करार झाला होता. 5 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर या कालावधीत अशोक यांनी सुरेश यांच्याकडून साडेसहा लाख रुपये घेतले होते.

परंतु त्यांनी ऊसतोड मजूर पुरवलेच नाहीत. तसेच तो सुरेश यांचे पैसे देखील देण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे सुरेश यांनी अशोक यांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.