हुपरी शहराला आजही अवैध धंद्यांचा प्रचंड मोठा विळखा आहे. रंगेहाथ पकडून गांजा तस्करी, तीन पानी जुगार, मटक्याच्या कितीतरी प्रतिबंधात्मक कारवाया झालेल्या आहेत. गेल्या महिन्यात रोख रक्कमेसह मुंबई कल्याण मटक्याच्या चिट्ट्या घेत असताना आरोपींना रंगेहाथ पकडले होते. पो. कॉ. संदेश शेटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिपक रघुनाथ कोळी याचेवर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
तर उघड्यावर बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या अमित आनंदा नवले याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. अशा अनेक कारवाया झाल्या परंतु क्लब, मटका, अवैध धंदे रोखण्यात चालली आहे.याला आळा जुगार, दारु विक्री बंद झाली कोण घालणार असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे.