कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पन्हाळगड व परिसराला शुक्रवारी रात्री तासभर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यावेळी पडलेल्या पावसाची वीस मिलिमीटर इतकी नोंद झाली.दरम्यान होणाऱ्या पावसाने ऊस आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडला. शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी, चंदगड, करवीर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. साडेसात ते साडेआठ या एक तासात पावसाने झोडपून काढले. त्यानंतर उशिरापर्यंत हलक्या प्रमाणात ढगांच्या गडागडाटासह पाऊस सुरू होता.