खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार सुहास बाबर यांच्या विकास प्रवास प्रारंभ झाला असून शनिवारी विधानमंडळात विशेष अधिवेशन मध्ये आमदारकीचा शपथविधी सोहळा झाला. आमदार रोहित पाटील व आमदार सुहास बाबर यांचा विधान मंडळातील प्रवेशांची चर्चा मतदारसंघात असून स्व. आर. आर. पाटील व स्वर. अनिल भाऊ बाबर यांनी असाच प्रवेश सन 1990 साली झाला होता त्याची पुनरावृत्ती चे संकेत मिळाले.
नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सत्कार यावेळी शुक्रवारी आमदार सुहास बाबर यांनी मंत्रालयात केला. विशेष अधिवेशनात दरम्यान विधान मंडळात शनिवारी आमदार यांचा शपथविधी सोहळा झाला. आमदार सुहास बाबर यांनी आमदार नसतानाही स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात विकास कामांना गती दिली होती. त्यांचे दृश्य स्वरूप सध्या जनतेतून विक्रमी मतदान आमदार सुहास बाबर यांना मिळाले असून जनसेवेसाठी 24 तास वेळ देत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संभाव्य मंत्री आमदार सुहास बाबर यांची शक्यता वर्तवली जात आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघात आमदार सुहास बाबर पर्व सुरू झाले आहे. जनतेचा कौल त्यांच्या बाजूने असून विकासाला प्रामुख्याने गती देण्याचे काम सुरू आहे. स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या विचारांनी आमदार सुहास बाबर काम करत आहेत वरिष्ठ नेते मंडळी बरोबर विकास कामाबाबत संपर्क ठेवण्याचे काम ते करत आहेत.