कोरोचीत रविवारपासून पाणीपुरवठा होणार सुरळीत, पाण्याचा जपून करावा लागणार वापर

कोरोची गावाला रुई बंधाऱ्यावरून पंचगंगा नदी पात्रातून पाण्याचा उपसा होतो. तेथून गावाला पाणी पुरवठा केला जातो. गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून १५ ते १६ डिसेंबर २०२४ पर्यंत गावाला पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. जॅकवेल मधील गाळ काढण्याचे काम व फिल्टरवरील देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यासाठी या योजनेद्वारे गावाला होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे, त्यामुळे गावकऱ्यांना आणखी काही दिवस पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस सहकार्य केले यापुढेही करावे लागणार असल्याचे सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी सांगितले आहे.

जॅकवेल नजीकचा गाळ काढल्यामुळे कोरोची गावाला मुबलक व जास्त वेळ पाणीपुरवठा केला जाईल तसेच सदर जलस्वराज प्रकल्प टाकी मधून दोन ते तीन ट्रक गाळ काढण्यात आला आहे. यासाठी २० ते २५ लाख खर्च करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गावात आणखी काही दिवस पाणी पुरवठा होणार नसल्यामुळे पाण्याचे संकट उभे राहणार आहे.