आळतेत सहा जुगऱ्यांवर गुन्हा

आळते येथे जुगार खेळणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी दोन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

किरण रवींद्र कांबळे (वय ४०), रियाज रमजान फरास ,अल्ताफ सलीम मुजावर (वय २९) रफिक गुलाब मुजावर (५२), सुनील शामराव कदम(३२) संदीप अशोक कदम , या सहाजणांवर हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आळते येथील हॉटेल जल्लोषाच्या मागील शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली सहाजण उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांच्या छाप्यात सहाजण उघड्यावर जुगार खेळताना रंगेहाथ आढळले.