पेठ येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. यानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवाभावी मंडळाने संयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन संध्याकाळी होताच स्वामी समर्थ मंदिरासमोर महिला व भक्तांनी स्वागत केले. यानंतर गावातून पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यामध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले होते. या सोहळ्यात गावातील भजन मंडळे, सेवाभावी मंडळे, तसेच ग्रामस्थ सहभागी झाले. प्रदक्षिणा सोहळ्यानंतर स्वामी समर्थ मंदिरात रात्री ८ वाजता पालखीचे आगमन होऊन महाआरती झाली.
या पालखी सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, जगन्नाथ माळी, माजी सरपंच विजयकुमार पाटील, शाहूराज पाटील, नागेश पेठकर, आषिश माळवदे, प्रसन्न खकाळे, रवी गोंदकर, तसेच श्री स्वामी समर्थ सेवा भावी मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे अभिषेक घातला. यानंतर पालखीचे प्रस्थान केले.