अंबप येथे उद्या शुक्रवारी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे तात्यासाहेब कोरे व खासदार बाळासाहेब माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ व जनता कुकुटपालन, पशुखाद्य निर्मिती सहकारी संस्था यांच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धा शुक्रवारी (ता. १३) होणार आहे. पुरुष खुलागट १० कि.मी., महिला खुला गट ५ कि.मी., मुले ८ वी ते १० वी ३ कि.मी., मुली ८ वी ते १० वी २ कि.मी., मुले ५ वी ते ७ वी २ कि.मी., मुली ५ वी ते ७ वी १ कि.मी. अशा गटांत स्पर्धा होणार आहेत. पहिल्या पाच क्रमांकांना रोख बक्षीस, प्रशस्तिपत्र व चषक बक्षीस देण्यात येणार आहेत. स्पर्धेची नाव नोंदणी अंबप गर्ल्स स्कूलमध्ये करावी.