हुपरी येथील मुस्लिम सुन्नत जमियतने अवैधपणे उभालेल्या मदरशाला कागदपत्रे सादर करण्यासाठीचा कालावधी संपल्याने प्रशासनाने या मदरशाचे बांधकाम तात्काळ तोडावे, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना १२ डिसेंबर या दिवशी देण्यात आले.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या संदर्भात जमियतकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसतांना जमियतने हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि तसेच हे प्रकरण वक्फ बोर्डाकडे सादर केल्यामुळे मदरशाचे अतिक्रमण काढू नये, असे निवेदन हुपरी नगर परिषदेत दिले आहे.
वास्तविक या जागेच्या संदर्भात सध्या कोणताही दावा, वाद न्यायप्रविष्ट नसून सदरचे अतिक्रमण निष्कासित करून भूमी खुली करण्याच्या संदर्भात न्यायालयाचा कोणताही मनाई अथवा स्थगितीचा आदेश नाही. त्यामुळे सदरच्या मदरशाचे अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडावे.