हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी येथे सहा वर्षांचा बालक शाळेत जावे लागेल म्हणून अचानक गायब झाला. त्यामुळे त्याला शोधताना पालकांसह नागरिकांची धावाधाव सुरू झाली.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्यावर तो कुठे आहे ते कळाले आणि मुलगा सापडताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.अंबपवाडी येथीप सहा वर्षांचा मुलगा शाळेत जाणार नाही म्हणून पालकांकडे हट्ट धरून बसला. शाळेला जायच्या वेळी त्याला घरी शोधू लागले. थोड्या वेळाने मुलगा घरातून अचानक गायब झाला.
दुपारी 3 पर्यंत मुलगा सापडला नाही. त्यानंतर तरुणांनी त्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. तेव्हा तो मुलगा गावाच्या वेशीबाहेर ज्वारीच्या शेतात बसल्याची माहिती मिळाली. नागरिकांनी तिकडे धाव घेतली आणि मुलगा मिळून आला.