हुपरी चांदी हस्तकला उद्योगाची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

हुपरी व हुपरी परिसरातील नऊ गावांमध्ये चांदी हस्तकला दागिने बनवण्याचा उद्योग शतको वर्षापासून सुरू आहे. नजीकच्या काळात या ठिकाणच्या काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी येथील व बाहेरील विविध बाजारपेठेतील उद्योजकांना बनावट भेसळयुक्त कमी टक्केवारीचे चांदी पाटले (विटा) देऊन फसवणूक करण्याच्या घटना केल्या आहेत त्यामुळे हुपरी व परिसरातील चांदी व्यवसायावर फार मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. चांदी उद्योगाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही कालावधीत वारंवार घडत असून अशा व्यक्तींना कायद्यान्वये कडक शासन न झाल्याने ही प्रवृत्ती फोफावत आहे.

अशा घटनेचा व प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्याकरिता सर्व चांदी उद्योजक व्यवसाय यांच्या मागणीवरून चांदी कारखानदार असोसिएशन हुपरी या ठिकाणी मीटिंग बोलवण्यात आली. या मीटिंगमध्ये जोपर्यंत गुन्हेगाराला पकडले जात नाही तोपर्यंत चांदी उद्योजक गप बसणार नाहीत अशा भावना व्यक्त करून सोमवारपासून हुपरी शहर बेमुदत बंद ठेवण्याचा व उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपोषणाला धनंजय नामदेव धायगुडे हे बसणार असून गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडण्यात यावे असे निवेदन हुपरी पोलीस स्टेशनचे स. पो. नि. चौखंडे यांना देण्यात आले. 

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष दिनकरराव ससे, बबनराव भोसले, सूर्यकांत जाधव, रणजीत वाईंगडे, प्रवीण चौगुले, नेताजी निकम, रामदास म्हेतर, भाऊसाहेब गायकवाड, अजित सुतार, मोहन खोत, आदी मान्यवर उपस्थित होते.