हुपरीत गांजा विक्री विरोधात उद्या मोर्चा!

हुपरी पंचक्रोशीत अमली पदार्थ सेवनाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अमली पदार्थांच्या सेवनातून निर्माण होणारी नशा ही युवकांच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम करते. त्यांची बौध्दिक क्षमता देखील संपते. नशेच्या अधीन राहून युवा पिढी अमली पदार्थांच्या तस्करी बरोबरच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या विरोधात युवासेना सदस्य शिवाजी जाधव यांनी दंड थोपटले आहे. यामुळे पुन्हा हा गंभीर विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

हुपरी पंचक्रोशीतील संपूर्ण गावांमध्ये सुरू असलेला गांजाच्या खुलेआम विक्री विरोधात कडक कारवाई युवासेना सदस्य जाधव यांची माहितीकरण्याकरिता सोमवार ता. २७ रोजी कार्यालय ते पोलिस ठाणे असा भव्य मोर्चा निघणार असल्याची माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य जाधव यांनी दिली आहे.या मोर्चामध्ये समाजातील जागरुक व जबाबदार नागरिक म्हणून सहभागी होत हुपरी शहराला गुन्हेगारी विळख्यातून वाचविण्यासाठी सामील व्हा असे आवाहन शहरप्रमुख राजेंद्र पाटील यांनी केले आहे. शहरात चांदी उद्योगाच्या माध्यमातून बाहेरच्या राज्यातील कामगारांचा ओढा जास्त आहे. यामुळे हुपरी शहरासह पंचतारांकित औद्योगिक वसाहत चरस, गांजा विक्रीचे केंद्र निर्माण झाले आहे.

संपूर्ण पंचक्रोशीत खुलेआम विक्री होत आहे याला कोणाचाच पायबंद नाही. पोलिसांकडून याकामी गांजा सेवन करणाऱ्या टोळक्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. पण गांजा तस्कर नामानिराळे राहात आहेत. हुपरी शहरात बाहेरच्या राज्यातील अनेक कामगार कामाच्या निमित्ताने ये-जा करतात यातूनच हा अवैध धंद्यांना बळ मिळाले आहे. अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे.यातून युवा पिढी भरकटलेली पहायला मिळत आहे. तेव्हा यामध्ये सामील असणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना शोधून पोलिस प्रशासनाने कठोर शासन करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून जाधव यांनी दिला आहे