वाळवा तालुक्यातील आष्टा नगर परिषदेला अत्याधुनिक अग्निशमन गाडी मिळाली. या गाडीचे उद्घाटन मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी मनोज कुमार देसाई म्हणाले, आष्टा नगरपरिषदेला महाराष्ट्र अग्निशमन व आणीबाणी सेवांतर्गत सहा हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली व एक हजार लिटर फोम फवारणारी ९० लाखांची अत्याधुनिक २२० एचपी अग्निशमन गाडी मिळाली. यापूर्वी १८० एचपीची गाडी मिळाली असून गल्लीबोळामध्ये जाण्यासाठी अग्निशमन बुलेट ही मिळाली आहे. नवीन अग्निशमन गाडीला सीसीटीव्ही तसेच वॉकीटॉकीचीही सोय करण्यात आली आहे.
आष्टा नगर परिषदेच्या ताब्यात अत्याधुनिक अग्निशमन गाडी आल्याने आष्टा परिसरात तातडीने आग आटोक्यात आणणे शक्य होणार आहे.या वेळी प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे, करनिरीक्षक दीपाली चव्हाण, पाणीपुरवठा अधिकारी शरदचंद्र पाटील, अभियंता गिरीश शेंडगे, रोहित वायचळ, स्वप्निल पाटील, अनिकेत हेंद्रे, गणेश घोणे, सचिन मोरे, प्रियांका भोसले, मोनिका पाटील, पूनम पाटील, संतोष खराडे, सुधीर कांबळे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.