सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत तर काही भागातिल विकासकामे अजूनही अपूर्ण असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हि प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. पण याला अनेक वेळा वेटिंगवरच ठेवले जाते. आष्टा एमआयडीसीचा प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने एमआयडीसीला तत्त्वता मंजुरी दिली. केवळ जमिनीची पाहणी करण्या व्यतिरिक्त पुढे कोणतीच कार्यवाही केली नाही. आष्ट्यात एमआयडीसी होईल, हाताला काम मिळेल या आशेवर आष्टा व परिसरातील युवक, नव उद्योजक प्रतीक्षेत आहेत.
आष्टा एमआयडीसीच्या कामाला गती मिळावी, लवकरात लवकर कार्यवाही व्हावी व हा प्रश्न मार्गी लागावा याबाबतचे निवेदन कै. बापूसो शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. येथील उद्योजकांच्या कार्यक्रमानंतर त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. पण सविस्तर चर्चा न होऊ शकल्यामुळे पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आष्टा एमआयडीसीसाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डी. एस. कोळी, श्रीराम ढोले व कै. बापूसो शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संग्राम शिंदे, शहाजान जमादार उपस्थित होते.
