आष्ट्यात विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

आष्टा(Ashta) इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आष्टा शहरातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे संचालक राहुल महाडिक तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे भाजपात जोरदार स्वागत करण्यात आले.

 यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य स्वरूपराव पाटील, भाजपा नेते प्रसाद पाटील हे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी अमित थोटे, संग्राम शिंदे, शहाजहान जमादार, संकेत कोळी, प्रशांत देसाई, साजन अवघडे, राजाराम पाटील, गौतम कदम, विकास गायकवाड, स्वप्निल मुळीक, विनोद कांबळे, यांच्यासह इतर मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी आष्टा शहरातील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपलेले सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी यांचा भाजपा प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. राम ढोले, गजानन पाटील, अभिजीत बिरनाळे, गजानन दाटीया, रवी तोडकर, अनिल गुळीक यांच्यासह शहरातील इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आष्टा शहर अध्यक्ष साजन अवघडे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केल्याने शहरात भाजपचे बळ वाढले आहे.