कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरात हॅकर्सचा धुमाकूळ, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे खून मारामारी फसवणूक असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहर हॅकर्सच्या वाढत्या धमक्या आणि ऑनलाइन सायबर गुन्ह्यांमुळे चिंतेत आहेत. सध्या सोशल मीडिया, बँकिंग आणि डिजिटल पेमेंटसाठी लोकांचा वापर वाढला आहे. याचाच फायदा घेत हॅकर्स ने अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे चित्र सध्या दिसू लागलेले आहे.

इचलकरंजी शहरांमध्ये लहान व्यवसायिक व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे तर अनेक लोकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे कट होतानाचे अनेक प्रकार घडले आहेत. तसेच सोशल मीडियावर खोटी माहिती व वायरल लिंक्सच्या माध्यमातून हॅकर्स नागरिकांच्या व्यक्तिगत माहितीला ताब्यात घेत आहेत.

तर सध्या इचलकरंजी शहरांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून अनेक नागरिकांच्या मोबाईलवर मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या लिंक व अनेक अनोळखी नंबर वरून फोन येत आहेत. तर अनेक लोकांना फिशिंग घोटाळ्यासाठी अडकवले गेले आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या समस्येवर उपाय शोधण्याचे आवाहन केले आहे.

तरी यासाठी पोलीस प्रशासनाने सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी मार्गदर्शन शिबिर सुरू केले आहेत. तरीही हॅकर्सच्या वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. सायबर सुरक्षा तज्ञ आणि पोलिसांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना करण्याची गरज आहे जेणेकरून नागरिकांची माहिती आणि पैसा सुरक्षित राहील. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनाही सतर्क राहण्याची आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांची पद्धत शिकण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.