इचलकरंजी येथे आत्मदहन करणाऱ्या युवकाची प्रकृती चिंताजनक

शेखर गायकवाड याने पत्नीच्या नावावर सात लाखांचे कर्ज काढून तिची आर्थिक फसवणूक केली होती. त्याच्या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने नोटरीवर त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र शेखरने तिला सोडण्यास नकार दिला. शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर शेखर गायकवाड याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. सध्या त्याच्यावर कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी घेतली असून याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. 

पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. श्री. साळवे हे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शुक्र सकाळपासून तळ ठोकून होते. या घटनेशी संबंधित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीना बोलावून माहिती घेतली जात होती. ठाणे अंमलदारपासून पोलिस उपनिरीक्षकापर्यंत ते आग विझवताना जखमी झालेले पोलिस कर्मचाऱ्यापासून उपस्थित नागरिकांपर्यंत सर्वांची पोलिस ठाण्यात चौकशी करून जबाब घेण्याचे काम सुरू होते.