इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीसाठी चढाओढ सुरू झालेली आहे. उमेदवारी कोणाला मिळणार यासाठी अनेक तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत. अशातच इचलकरंजी शहरात शासकीय कार्यक्रमासाठी महायुतीचे सर्वच नेते एका स्टेजवर आले होते. यावेळी महायुतीतील इचलकरंजी विधानसभेची रंगीत तालीम पाहायला मिळाली. त्यामध्ये खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, शहराध्यक्ष, माजी आमदार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
तर महायुतीतील सर्वच पदाधिकारी असल्यामुळे स्टेजवर नेत्यांची रीघ लागली होती. सध्या सात ते आठ नेते आमदारकीची निवडणुकीची स्वप्ने पाहू लागले आहेत. त्यामुळे स्टेजवर बोलताना आमदार कोण होणार याकडे आमदार एकमेकांकडे बोट दाखवत होते. त्यामध्ये खासदार धैर्यशील माने यांचे भाषण झाल्यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रकाश आवाडे यांच्यावर टीका केली.
तसेच भाषणामध्ये बोलताना टोमणेही मारण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी हसन मुश्रीफ, सुरेश हा, रवींद्र माने विठ्ठल चोपडे, अनिल डाळ्या, पैलवान अमृत मामा भोसले यांची नावे घेऊन त्यांच्यावरही टोमणे मारण्यात आले.
यावेळी राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांच्या ड्रायव्हर मध्ये झालेला वादाचा किस्साही सांगितला. तर यावेळी खासदार, आजी-माजी आमदार यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली. पण येणाऱ्या विधानसभेची महायुतीची रंगीत तालीम नाट्यगृहांमध्ये पाहायला मिळाली.