आवाडे- यड्रावकर यांच्या नावाची चर्चा सुरू

नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये महायुतीने प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. नुकतेच सर्व आमदारांनी आमदारकीचे गोपनीयतेची शपथ देखील घेतली. उद्या म्हणजेच 15 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा दुपारी तीन वाजता नागपूर येथे होणार आहे. या विस्तारात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार डॉ. राहुल आवाडे या दोघांना संधी मिळणार आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे. शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक तास नऊ मिनिटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर 22 मिनिटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा कानावर घातली.