इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मजरेवाडी येथील कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिका बदलण्याचे काम सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील सुमारे साडेपाच किलोमीटर पाईपलाईन बदलण्यासाठी 21 कोटी मंजूर झालेले आहेत.
परंतु आठ महिने उलटले तरी त्याचे काम हे कासवगतीने सुरू आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी अवस्था येथील महासत्ता चौकात टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची झालेली आहे.कृष्णा नळपाणी योजनेची नवीन वितरण नलिका टाकण्याचे काम हे महिन्यापूर्वी रस्ता खुदाई करून अर्धवट स्थितीत काम बंद ठेवले आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये खूपच संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे काम करायचे नसेल तर खुदाई कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.