माणगाव बंदला उस्फूर्त प्रतिसाद, बंद शांततेत पार

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिमेची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ माणगाव बंदची हाक देण्यात आली होती. गावातील सर्व व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून या बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिला. बौद्ध समाजातील सर्व अनुयायांनी व ग्रामस्थांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर या घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. दरम्यान या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शवला.