रुई येथील युवकाचा विजेच्या खांबाला दुचाकी धडकून मृत्यू….

हातकणंगले तालुक्यातील रुई येथील मानस विजय जाधव वय 22 हा आपल्या मित्रांसमवेत आळते येथील रामलिंग मंदिराकडे देवदर्शनासाठी गेला होता. देवदर्शन आटोपून घरी परतत असताना हातकणंगले रामलिंग रस्त्यावर भरधाव मोटार सायकलवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला दुचाकीची जोरात धडक बसली. यात मानस व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले होते. इचलकरंजी येथे खाजगी दवाखान्यात उपचारावेळी मानस याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे. अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.