आमदार प्रकाश आवडे यांनीही पुरग्रस्त भागाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून माहिती जाणून घेतली. तसेच शाळेमध्ये स्थलांतर झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यकता उपायोजना तयार असल्याची माहिती दिली. नागरिकांनी अफवांना बळी न पडता घाबरून न जाता प्रशासना सहकार्य करावे अशी आवाहनही त्यांनी केले.
पावसाचा जोर ओसरला असला तरी हातकणंगले तालुक्यातील चंदुर गाव नदीकाठी असल्यामुळे महापुराचा प्रचंड फटका बसत आहे. पुरामुळे काही घरांची पडझड तसेच शेतीतील पिकांचे -नुकसान झाले आहे. या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी बाधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली व उपाय योजना बाबत अधिकाऱ्यांना आवश्यकता सूचना केल्या.
आमदार आवाडे यांनी हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम व सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाला बाधित कुटुंबीयांची राहण्याची, चहापाणी, नाश्त्याची तसेच जेवणाची व्यवस्था आवाडे कुटुंबीय व ग्रामपंचायत चंदुर यांच्या माध्यमातून तसेच जनावरांसाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्या मार्फत छावणीमध्ये असणाऱ्या सर्व जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता करून दिली आहे अशी ही माहिती दिली.
