नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी…

वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा जगजाहीर आहेच. पाणीटंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अजून देखील इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा संपलेला नाही. सतत होत असलेल्या गळतीमुळे तसेच अन्य कारणामुळे इचलकरंजी शहरवासीयांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी सतत गळती होत राहिल्या कारणाने शुद्ध केलेले पाणी गटारीत वाहतानाचे चित्र दिसत आहेत. महापालिकेने प्रत्येक जलकुंभ परिसरातील गळती काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मक्तेदार नेमून देखील गळतीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे नवीन जलवाहिनी टाकण्याचे शहरातील काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.