इचलकरंजी शहरातील रस्त्यांची खूपच दुरवस्था झालेली सर्वांच्या नजरेस आहेच. या रस्त्यांमुळे अनेक अपघात देखील होतानाचे चित्र आहेच. इचलकरंजी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची वाताहात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये विविध कारणावरून उकरण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे, चरी पडल्या असून वाहनधारकांना जीवाशी बेतेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेव्हा महानगरपालिका महासत्ता चौकात मधोमध पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती निर्माण झालेली आहे. प्रशासनाने किमान खड्ड्यांचे तरी पॅचवर्क करावेत, अशी माफक अपेक्षा शहरवासियांतून केली जात आहे.
शहरातील प्रमुख मार्गावरून अनेक छोटी-मोठी वाहने सुसाट जात असतात. मात्र रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात एखादी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनधारक एखाद्या पादचाऱ्यासह किंवा वाहनावर अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.