इचलकरंजीतील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय योजनांची गरज

सध्या अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावि लागते. वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात पाण्याची समस्या खूपच जगजाहीर आहे. शहरवासीयांना पाण्यासाठी खूपच समस्यांना सामोरे जावे लागते. नदी प्रदूषण तर सतत होणारी गळती यामुळे नागरिकांना पाणीटंचाईस तोंड द्यावे लागते. सध्या इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याचे दिसून येते आहे.

इचलकरंजीसारख्या  विकसित शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठा आवश्यक आहे. दीर्घकालीन उपाययोजनांनी ही समस्या सोडवता येऊ शकते. इचलकरंजीतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जलसंधारण, गळती रोखणे, पर्यायी जलस्त्रोतांचा विकास आणि प्रभावी नियोजन महत्वाचे आहे. प्रशासनाने आणि नागरिकांनी एकत्रितपणे यावर काम केल्यास शहराची पाणी समस्या सोडवता येऊ शकते.

इचलकरंजी शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याचा पुरवठा कमी होत आहे. जुन्या आणि गळती होणाया पाइपलाइनमुळे मोठ्याप्रमाणावर पाणी वाया जाते. शहराला पाणी पुरवठा करणाच्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्यामुळे वारंवार गळती होते. आणि दुरुस्तीच्या काम मुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. गळती रोखण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम जलद गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

त्याबरोबरच वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा यामुळे ही पाणी उपस्थावर परिणाम होत आहे. यासाठी उपसा आणि जलशुद्धीकरण केंद्रांसाठी विशेष वीजपुरवठा योजनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या वेगाने होणाऱ्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढली आहे, परंतु त्यानुसार व्यवस्थापन अद्ययावत केलेले नाही. कृष्णा नदीवरून होणाऱ्या उपस्यावरच शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे.

पंचगंगा नदी, कट्टी मोळ या पर्यायी जलस्रोतांचा वापर केला जात नाही, परिणामी टंचाई जाणवते. पाणी साठवण, वितरण आणि वापर यामध्ये नियोजनाचा अभाव आहे. वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरण यामुळे पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे सध्याची जलसंपत्ती अपुरी ठरत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा जाणवतो. यासाठी नागरिकांनी जबाबदारीने पाणी वापरावे यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवून स्थानिक प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय वाढवणे आवश्यक बनले आहे.