खासदार मानेंच्या माध्यमातून केएनपी नगर इस्लामपूर येथील ड्रेनजचा प्रश्न सोडविण्यात यश

इस्लामपूर प्रभाग क्रमांक एक मधील केएनपी ८० फुटी रिंग रोड जवळील ड्रेनेजचे पाणी पावसात नागरिकांच्या घरात जात होते. गेली काही वर्ष या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. पण आज हा प्रश्न खासदार मानेच्या माध्यमातून सोडविण्यात यश आले असल्याचे महाडिक युवाशक्ती अध्यक्ष सुजीत थोरात यांनी माध्यमाना सांगितले.केएनपी नगर इस्लामपूर येथे मुख्य रस्ता नजीक खासदार निधीतून ड्रेनज चे काम सुरु आहे.

या कामावेळी रस्त्याच्या मधील पाण्याची पाईप बदला यासाठी अनेक नागरिकांनी माझ्याकडे व शासनाच्या टेंडर मध्ये हे काम बसत दिला होता, परंतू आज सार्वजनिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या. परंतू नसल्याने कॉन्ट्रॅक्टर ते करण्यास नकार बांधकाम विभागाच्या मिटिंग मध्ये आम्ही खासदार माने व जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली व त्यांनी ही प्रशासनाला विंनती केली आणि या ड्रेनेजच्या पाईप बदलल्यामुळे आरोग्याच्या समस्या कमी होतील तसेच अनेक दिवसाचा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे प्रशासनाने ही परवानगी दिली.

त्यांनतर लगेचच कॉन्ट्रॅक्टर रोहन शहा यांनी याचे काम सुरु केले आणि दिवसा अखेर ते संपले आणि ड्रेनेजचे पाणी जाण्याचा मार्ग खुला झाला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. लवकरच या कामाचे आमचे नेते खासदार धैर्यशील माने, राहुल महाडिक, आनंदराव पवार, सागर मलगुंडे व स्थानिक नागरिकांच्या हस्ते उदघाटन घेण्यात येणार आहे.